क्रांती नगर मधील आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्त्व हरपले…!!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

सरस्वती चाळ, क्रांती नगर, आंबेडकर चौक, कांदिवली पूर्व मधील जुने आणि जेष्ठ रहिवासी, आंबेडकरी चळवळीतील जुने-जाणते कार्यकर्ते, कणखर आणि निडर नेतृत्व अशी जनसामान्यांत ओळख असणारे महादेव कांबळे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यामुळे काल दिनांक १६/०२/२०२५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७/०२/२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आंबेडकर चौक येथून निघणार आहे.

Advertisement

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुले, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्त्व हरपल्याने विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

“निर्भीड समाचार” च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x