RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजप वर हल्लाबोल
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या निराशजनक कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी भाष्य केलं आहे. त्यांचा पराभव होण्यामागे अंहकार कारणीभूत असल्याचं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. निवडणुकीत झालेल्या पराभवात भाजपला त्यांच्या वैचारिक मातृसंस्थेकडून टीकेचा सामना करावा लागला.
जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार यांनी भाष्य केलं आहे. ज्यांनी प्रभू रामाची भक्ती केली ते हळूहळू अहंकारी बनले. त्याच पक्षाला आता सर्वात मोठा पक्ष म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र आता अहंकारामुळे प्रभू श्रीरामाने त्यांना केवळ २४० वर थांबवले, असं इंद्रेश कुमार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत २४० सर्वाधिक जागा जिंकलेल्या पण बहुमताचा आकडा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या भाजप पक्षावर टीका झाल्याचं दिसून आलं. भाजपचं २०१४ नंतर हे सर्वात वाईट प्रदर्शन होतं. यावेळी बोलत असताना कुमार यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केल्याचं दिसत आहे.
जनसेवेत नम्रता आवश्यक असल्याचं काही दिवसांआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. भागवत म्हणाले, खरा सेवक प्रतिष्ठा राखतो. काम करते वेळी तो शिष्टाचार पाळतो. मी हे काम केलं असं म्हणण्याचा त्यांच्याच घमेंडीपणा असतो. तोच खरा सेवक म्हणता येईल, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता वक्तव्य केलं आहे.
अहिंसा आणि सत्याच्या तत्त्वांचा हवाला दिला असल्याचं भागवत यांनी सर्वांप्रती नम्रता आणि सद्धभावनेची गरज त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकाचा राज्यातील निकाल पाहिल्यास महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा अनेक पाऊलं पुढे आहेत. महाविकास आघाडीने राज्यात ३० जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुती हा १७ जागांवर विजयी आहे. तर एनडीएने २९३ जागांवर विजय मिळवला. तसेच इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवल्याचं दिसून आलं आहे.





