“Game Not Over Wait”
लोकसभा निवडणुकीमधे महायुतीला २९३ जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आता दिल्लीत अनेक खलबतं सुरु आहे. अशातच निकालानंतर देशातील नागरिकांचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे आहे.
एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आता सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. अशातच लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहेत.
दुसरीकडे इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळवून देशातल्या इतर पक्षांना थेट खुलं निमंत्रण दिल आहे. संविधानावर विश्वास असणाऱ्या पक्षांनी इंडिया आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन देखील काँग्रेस अध्यक्षांनी केलं आहे. या सर्व राजकीय उलाढालीनंतर इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं गेलं आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “Game Not Over Wait” . आता या ट्वीटमुळे देशभरात चांगलीच चर्चा सुरू आहेत. आता देशातील जनतेला सत्तासंघर्ष पाहायला मिळणार का? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडीचा हा नवा डाव असणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत.
इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी एक बैठक घेतली होती. या बैठीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी संपर्क सांधला. ते म्हणाले की, “इंडिया अलायन्स योग्य वेळेची वाट तर पाहणार आहे. आम्ही देखील एकजुटीने निवडणूक लढवली आणि पूर्ण ताकदीने लढलो आहे. मोदींच्या जनमताला नकार देण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे.





