पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी


लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच आता पदवीधर निवडणूक जाहीर झाली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी मनसेने उडी घेतली आहे. त्यामुळे आता पदवीधर निवडणूकत धुमाकूळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे.

मनसेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.” मनसेच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisement

मात्र, आता अभिजीत पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल राज्यातील जनतेकडून विचारण्यात येत आहे. सध्या कोकण विभागात पदवीधर मतदार संघामधून मधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे.

अशातच त्यांच्या या जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोकण निवडणुकीत पदवीधर मतदार संघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे, तर मतमोजणी ही १ जुलैला होणार आहे. अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!