KKR चॅम्पियन ऑफ IPL २०२४
रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने हैदराबादचे आठ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१४ च्या मोसमात अखेरचे विजेतेपद पटकावले होते आणि तब्बल १० वर्षांनंतर अखेर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात संघाला यश आले.
मात्र यंदाच्या वर्षी पुरस्कार सोहळा काही खास होता. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदाच खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमने हा पुरस्कार जिंकला आणि बक्षीस म्हणून ५० लाख रुपये मिळाले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने फायनल सामना जिंकून तब्बल २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये ही सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला १५.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आयपीएल २०२४ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी ७ आणि ६.५ कोटी रुपये देण्यात आले.
विजेता संघ- २० कोटी रुपये (कोलकाता)
उपविजेता संघ- १०.५ कोटी रुपये (हैदराबाद)
तिसऱ्या स्थानावर असलेला संघ- ७ कोटी रुपये (राजस्थान)
चौथ्या स्थानावर असलेला संघ- ६.५ कोटी रुपये (बंगळुरु)
इमर्जिंग प्लेअर पुरस्कार – नितीशकुमार रेड्डी (हैदराबाद), २० लाख रुपये
इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द सिझन पुरस्कार – जेक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली)
फॅन्टसी प्लेअर ऑफ द सिझन पुरस्कार – सुनील नरेश (कोलकाता)
सुपर सिक्सेस ऑफ द सिझन पुरस्कार- अभिषेक शर्मा (हैदराबाद)
सर्वाधिक चौकार पुरस्कार- ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद)
कॅच ऑफ द सिझन- रमणदीप सिंग (कोलकाता)
फेअरप्ले अवॉर्ड पुरस्कार- हैदराबाद
ऑरेंज कॅप पुरस्कार- विराट कोहली (७४१ धावा, बंगळुरु), १५ लाख रुपये
पर्पल कॅप पुरस्कार- हर्षल पटेल (२४ विकेट्स, पंजाब), १५ लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर पुरस्कार- सुनील नरेन, कोलकाता, १२ लाख रुपये





