लोकशाही कि दडपशाही


आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. आपल्या भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आपला भारत सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे. असे म्हणतात कि आपल्या देशात लोकशाही नांदते. आपल्या देशाला  “सोने कि चिडिया”  म्हणायचे.  पण  या  “सोने कि चिडिया” म्हणणाऱ्या देशामध्ये इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले आणि आपल्या देशाला कंगाल केले. या इंग्रजांच्या विरोधात आपल्या भारतीय लोकांनी लढा दिला, आंदोलने केली, कित्येक जण फासावर चढले, शहीद झाले आणि तेव्हा कुठे जाऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

या स्वातंत्र्यामुळे आपली प्रगती झाली खरी पण आजच्या घडीला, वास्तविकतेला पाहून असे वाटते कि आपण पारतंत्र्यात असलेले बरे होतो निदान त्यावेळची इंग्रजांची गुलामीच बरी होती, असे वाटण्याचे कारण म्हणजे आजचे गलिच्छ राजकारण. आजघडीला राजकारण हे इतक्या खालच्या थराला गेले आहे कि आपण विचार देखील करू शकत नाही. सत्ते साठी “काय पण” हे जे म्हणतात ना ते अगदी तंतोतंत खरे आहे. “फोडा आणि राज्य करा”  हि जी इंग्रजांची नीती होती तिच नीती आज अंमलात आणली गेली आहे.

Advertisement

संविधाना मध्ये असलेल्या घटनेची पायमल्ली करून आज राजकारण केले जात आहे. “जिसकी लाठी उसकी भैस”  या म्हणीप्रमाणे “जिसकी सत्ता उसकी हुकूमत” असेच काहीसे चित्र देशात तयार झाले आहे. आज सत्तेत असणारा एक पक्ष संपूर्ण देशात आपले वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांवर कायदयाचा गैरवापर करून, धाक दाखवून आपल्या पक्षात येण्यास भाग पाडत आहे. जरी हे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसले तरी देखील त्यांना केंद्रीय सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून आपल्या पक्षात येण्यास भाग पाडत आहेत आणि हे नेते मंडळी देखील शिक्षेला घाबरून त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. म्हणजे आजघडीला राजकारण कोणत्या थराला गेले आहे याची कल्पना आपण करू शकतो.

देशातील  शिक्षण, रोजगार , महागाई या ज्वलंत समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्या ऐवजी लोकांचे मन धर्म आणि आरक्षण या गोष्टींकडे वळविण्यात आले आहे. आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ज्याप्रकारे जपान मध्ये हिटलरशाही अस्तित्वात होती अगदी त्याच मार्गावर आपला देश आहे का? असे वाटते.

“धर्म ही अफूची गोळी आहे”  हे वाक्य कुठल्याही धर्माचा अपमान करण्यासाठी नसून धर्माचा उपयोग माणसांच्या मेंदूमध्ये एक प्रकारची झिंग चढवून त्यांना इतर धर्मियांच्या विरोधामध्ये भयंकर आणि क्रूर कृत्ये करण्यासाठी किती सहजपणे केला जाऊ शकतो हे नमूद करण्यासाठी कार्ल मार्क्सने म्हटले आहे.

एकंदरीत आजची परिस्थिती पाहता असे वाटते कि आपल्या देशात  लोकशाही आहे कि दडपशाही …..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!