रोहित मुंबई सोडणार – वसीम अक्रम चे भाकीत

IPL २०२४ : देशात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. क्रिकेट चाहते आयपीएलचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये सर्व संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. प्लेऑफसाठी करो या मरोची स्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएल २०२४ मधून मुंबई इंडियन्सला बाहेर जावं लागलं आहे. याला कारण संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.
रोहित शर्माचं कर्णधारपद काढून पांड्याला देण्यात आलं होतं. यामुळे देशभरातील क्रिकेट रसिक आणि रोहित शर्माचे चाहते खूप नाराज झाले आहेत. रोहित शर्माचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पांड्याला मुंबई इंडियन्सचे चाहते हूटिंग करताना दिसत आहेत. रोहित शर्माचे कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहित मुंबई इंडियन्स संघ सोडणार असे भाकीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम याने केले आहे.
वसिम अक्रमने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. रोहितला आगामी सिझनमध्ये कोलकाताकडून खेळताना पाहायला आवडेल असं तो म्हणाला आहे. मला नाही वाटत की रोहित शर्मा हा मुंबईमधून खेळेल. मला त्याला गौतम गंभीरसोबत खेळताना पाहायचं आहे.
कोलकातामध्ये रोहित शर्मा हा चांगली फलंदाजी करतो. म्हणून त्याला कोलकातामध्ये पाहणं हे चांगलं असेल. यंदाच्या हंगामात रोहितला म्हणावी अशी कामगिरी करत आली नाही. रोहित आणि इशानने चांगली सुरूवात केली. मात्र मिडल ऑर्डरवर खेळणाऱ्या खेळाडूंना मैदानावर ताबा मिळवता आला नाही.
सनरायझर्स हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते संघाच्या खेळीवर नाराज आहेत. यंदाच्या आयपीएलमधून मुंबई इंडियन्स संघाला प्ले ऑफ मधून बाहेर पडावे लागले आहे.




