अनुदत्त विद्यालयाच्या “माझी शाळा माजी विद्यार्थी” संघातर्फे “मैत्री चषक २०२६” पर्व ३ रे स्पर्धेचे आयोजन..!!


मुंबई : *माझी शाळा माजी विद्यार्थी संघ आयोजित*
*✨ मैत्री चषक २०२६ – पर्व ३ रे ✨*
१ फेब्रुवारी २०२६

अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आजी-माजी विद्यार्थी यांच्या ‘माझी शाळा माजी विद्यार्थी’ या ग्रुप तर्फे मैत्री चषक २०२६, पर्व ३ रे अंडर आर्म क्रिकेट सामने कांदिवली पूर्व, लोखंडवाला संकुलातील लोकनेते गोपीनाथ मुंडे मैदान (टर्फ) येथे दिनांक १/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील एकूण ८ संघ तयार होते, पण ह्यावेळी विशेष म्हणजे महिलांना सुद्धा सहभाग करून घ्यायचं अस ठरवलं, त्याप्रमाणे २ संघ आपण महिलांचे तयार केले. महिला संघाचे तर विशेष कौतुकच आहे, शिवाय त्यांच्या खेळीने कार्यक्रम अजून मनोरंजनात्मक झाला.

ह्या एकूण १० संघा मध्ये आपल्या ” अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ” मधून सध्या ११ वी मध्ये शिकत असलेले काही आजी विद्यार्थी त्याचबरोबर माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच आयोजकांच्या सहचारिणी व त्यांच्या मुली ह्याप्रमाणे सहभाग होता.

श्री.महाजन सर, श्री.भोसले सर, श्री.सी. एस. पाटील सर, सौ. महाजन मॅडम, सौ. पराडकर मॅडम, श्री.कातकडे सर, श्री.कासार सर, श्री.सतीश स्वामी सर, श्री.बिरादार सर, श्री. खराटे सर, श्री.तोगरे सर आणि श्री. मिलिंद जाधव सर, हे सर्वजण ग्राउंडवर उपस्थित राहून आयोजक, प्रेक्षक आणि खेळाडू यांचे मनोबल सातत्याने वाढवत होते.

कार्यक्रमाच्या यशासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे ग्रुपचे मुख्य आयोजक अभिजीत पाळेकर, रवी पंदारे, विजय सोमासे, प्रज्योत कदम, महेंद्र करंबे, मनोज गुरव, दिलीप मर्चंडे तसेच कार्यक्रमाच्या दिवशी धावपळ करणारे सतीश जाधव, नितीन शिंदे, प्रकाश गायकवाड, संतोष स्वामी, राहुल खरात, विकास कांबळे, किशन गायकवाड, दीपक वाल्हे आणि इतर सर्व सहकारी आणि सर्वच टीमचे कॅप्टन्स आणि खेळाडू ज्यांनी दाखवलेली खेळाडूवृत्ती, आपले सर्वांचे मनापासून आभार 🙌

Advertisement

क्रिकेट सामन्याचे सूत्रसंचालन अभिजित पाळेकर, क्रिकेट सामन्याचे समालोचन सतिश जाधव व नितीन शिंदे यांनी तर आजारी असतानाही सचिन कांबळे यांनी थोड्यावेळासाठी का होईना कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. सतीश जाधव व नितीन शिंदे ना थोडासा आराम मिळावा म्हणून आपल्या महेंद्र करंबे, नितीन जाधव व समीर गाडे ह्यांनी समालोचन ची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली.

निलेश केरकर व मेहुल ह्यांनी पंचाची भूमिका पारदर्शक रित्या पार पाडली.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सामन्यांच्या मालिकेत शिवनेरी फायटर्स संघ अंतिम विजेते आणि सिंहगड वॉरियर्स संघ उपविजेते ठरले.

कार्यक्रम सुरळीत पार पडावा आणि आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात म्हणून पाठबळ देणारे रमेशभाऊ कळंबे आणि नवनिर्वाचित नगरसेविका पुष्पाताई रमेश कळंबे यांचे विशेष आभार🙏

तसेच आपल्या व्यस्त शेड्युल मधुन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या वार्ड क्र. २७ च्या माजी नगरसेविका वजा आमच्या शिक्षिका सौ. सुरेखा पाटील मॅडम,

दामू नगर येथील वार्ड क्र. २६ चे नवनिर्वाचित नगरसेवक वजा माजी विद्यार्थी श्री.धर्मेंद्र काळे दादा,

लोखंडवाला वार्ड क्र. २७ येथील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. नीलम सुरेश गुरव मॅडम आणि इतर सर्व पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार.

आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्व मान्यवरांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रम सुरळीत, दर्जेदार आणि भव्य स्वरूपात पार पडावा यासाठी खालील सर्व मान्यवरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व ऋणनिर्देश 🌹👏

प्रशांत कांबळे, समीर गाडे – समृद्धी बॅग्स, भारत गवळी, अपर्णा मोरे, प्रकाश गायकवाड, मनोज पाटील सर, महाजन सर, भोसले सर, महेंद्र करंबे, नितीन शिंदे, मनोज गुरव – चॅम्पियन क्लासेस, बबिता सुरवसे यांचे विशेष आभार…💐

या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे खेळाडू, शिक्षकवर्ग तसेच विभागातील रहिवासी, शाळेतील आजी-माजी विद्यार्थी, पाहुणे आणि हितचिंतक यांचे ‘माझी शाळा माजी विद्यार्थी ग्रुप’ तर्फे मनापासून खूप खूप आभार!

धन्यवाद
माझी शाळा माजी विद्यार्थी

9930043217


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x