नाटकांच्या पुढचं नाटक -“कवन” आता अबुधाबीत..!!


मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे

नाटक म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न विचारायच्या आधीच त्यावर लेबलं चिकटायला लागतात. व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर, लोकप्रिय—अशा वर्गीकरणांनी नाटकाची ओळख आधीच ठरवून टाकली जाते.

यानंतर केंद्रस्थानी येतो प्रेक्षक.
तो कोणत्या अपेक्षा घेऊन येतो?
त्याच्या आवडींची व्याप्ती काय आहे?

रंगमंचावर तो नेमकं काय शोधतो—मनोरंजन, प्रश्न, अनुभव की स्वतःचा आरसा? या सगळ्याचा अंदाज घेत घेत नाटकाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. पण याच प्रक्रियेत अनेक जण अडखळतात.
कारण नाटक स्वतः काय सांगू इच्छितं, यापेक्षा ते कुणासाठी आणि कसं असायला हवं याचाच विचार अधिक होऊ लागतो.
पण “कवन” यापेक्षा पुढचं नाटक आहे. आज यावर प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे, कारण हे नाटक आणि हे विचार समोर घेऊन जाणारी माणसं आपल्यातलीच आहेत.

Advertisement

तुम्ही हे वाक्य ऐकलंच असेल—
“तुमने आग 🔥 देखी है, मगर हम उस आग से निकलकर आए हैं.” प्रस्थापितांच्या बाजारात जेव्हा कुणी या अर्थाने बोलतो,
किंवा या अर्थाने काम करतो, तेव्हा चित्र बदलायला लागतं.
असाच संघर्षाचा, जिद्दीचा प्रवास करून समोर आलेल्या कलाकारांचं नाटक म्हणजे “कवन”. या नाटकातील प्रत्येक कलाकाराचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. म्हणूनच माझ्यासारखे अजून कितीतरी कलाकार आणि प्रेक्षक आज आनंदित असतील. भारतामधील नाटक अबुधाबीला जाणं नवीन नाही. पण असा विषय घेऊन, अशा आत्मविश्वासाने,
अशा धैर्याने नाटक आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची हिंमत करणारे कलाकार खऱ्या अर्थाने माझे हिरो आहेत. या नाटकाचे प्रयोग या आठवड्यात अबुधाबीला आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर असा ज्वलंत विषय मांडायला धमक लागते. नाटकाचे कथानक लिहिणारे सुदेश जाधव, आणि अभिनय करणारे प्रियपाल गायकवाड, सिद्धार्थ प्रतिभावन्त, धम्म रक्षित, अमृता तोडरमला, विजय, प्रवीण खाडे, अपूर्वा तर दिग्दर्शक अभिषेक मजुमदार सर
आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन..!!

असं मत “समीर तभाने” यांनी मांडलं आहे जे स्वतः नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक आहेत.

“कवन” नाटकाच्या संपूर्ण कलाकार टीमला निर्भीड समाचार कडून खुप खुप शुभेच्छा..!!

 


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x