डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कांदिवलीत AI शिबिर; तुषार मोहितेंचा पुढाकार..!!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

ज्ञानियाच्या संगती होईल आयुष्याची प्रगती…!!

काल आंबेडकर भवन, हनुमान नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई. या ठिकाणी प्रेशिक स्वाभिमानी संघ आणि यंग बॉईज मित्र मंडळ आयोजित AI (Artificial Intelligence) विषयक शिबीर आयोजित करून “पँथर तुषार मोहिते” यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ही आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतः पुरता मर्यादित न करता तो समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत ते ज्ञान पोचावे आणि समाजातील प्रत्येक वक्ती हा आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेसाठी सक्षम झाला पाहिजे याचं उद्देशाने बाबासाहेब यांच्या विचारला शोभेल अशी आगळी वेगळी जयंती या वरील संथा आणि मित्र मंडळातील तरुणांनी “तुषार मोहिते” याला असलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार उराशी बाळगून काल त्याची सुरुवात करण्यात आली.

AI म्हणजे फक्त फोटो आणि व्हिडिओ बनवणे नव्हे! आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात ‘Artificial Intelligence’ (AI) हे तंत्रज्ञान आपले भविष्य ठरवणार आहे. अनेकांना असे वाटते की फक्त काही AI टूल्स वापरले किंवा इमेज-व्हिडिओ जनरेट केले म्हणजे AI आलं, पण तसे मुळीच नाही.

AI म्हणजे नक्की काय? AI Ethics, Impact of AI on Daily Life and Employment, हि Technology धम्माच्या मूल्यांशी आणि आंबेडकरी विचारांशी जोडून आपण सामाजिक प्रगतीसाठी कसे वापरू शकतो? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काल एक विशेष शिबीर आयोजित केले गेले होते.
DhammaTech: Artificial Intelligence (AI) Awareness Seminar (Integrating Ambedkarite Buddhist Ethics) Organized on the auspicious occasion of the 135th Birth Anniversary of Dr. Babasaheb Ambedkar.

हा सेमिनार १० वीच्या विद्यार्थ्यांपासून ते नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला होता.

चला, AI Tech क्रांतीमध्ये सामील होऊया आणि आपल्या समाजातील प्रत्येकाला अधिक सक्षम बनवूया याच उद्देशाने घेण्यात आला.
याची संकल्पना आणि मार्गदर्शन – पॅन्थर तुषार मोहिते यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून “रिपब्लिकन सेना” पक्षाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व “अमन आनंदराज आंबेडकर” हे उपस्थित होते. यांच्या सोबत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव “विनोद काळे आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

मार्गदर्शन पर बोलत असताना “अमन आंबेडकर आणि विनोद काळे ” यांनी आपले कार्य असेच चालू ठेवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपलं हे शैक्षणिक कार्य गावागावापर्यंत, शहरातील वस्ती पातळी पर्यत घेऊन जावं कारण आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेब यांच्या विचाराची चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय.”शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” याचं आदर्श आपण समाजातील शिकणाऱ्या पिढीला काळानुसार गरज असणाऱ्या शिक्षणाची तोंड ओळख करून देताय.

Advertisement

ज्याचा उपयोग आजच्या या स्पर्धेच्या युगात ठिकाण्यासाठी, स्वतःला पात्र ठरवण्यासाठी पुढील येणाऱ्या पिढ्याना आपण घडवताय याचा जास्त अभिमान वाटतो. त्यासाठी काहीही मदत पाहिजे असल्यास आपण नक्की करू असं मनत आपले शिबीर “आंबेडकर भवन” दादर, मुंबई येथे सुद्धा आयोजित करू असं आश्वासन दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अवघ्या जगासाठी उत्सवाचा क्षण आहे. मात्र, कांदिवलीतील तरुणांनी ही जयंती केवळ घोषणाबाजी किंवा मिरवणुकीपुरती मर्यादित न ठेवता, बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक नवा आदर्श घालून दिला आहे. कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगरमधील आंबेडकर भवन येथे प्रेशिक स्वाभिमानी संघ आणि यंग बॉईज मित्र मंडळ यांच्या वतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) विषयावर एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मिळालेल्या ज्ञानाचा विनियोग समाजासाठी: तुषार मोहितेंचा निर्धार
या उपक्रमाचे मुख्य सूत्रधार आणि मार्गदर्शक “पँथर तुषार मोहिते” यांनी आपल्याकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी आजचा तरुण जागतिक स्पर्धेत टिकणे आवश्यक आहे. याच उद्देशाने, आपल्याला मिळालेले ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते समाजातील प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना मिळावे, यासाठी त्यांनी हा ‘धम्म टेक’ (Dhamma Tech) उपक्रम सुरू केला.

तुषार मोहिते आणि प्रशिक स्वाभिमानी संघ, यंग बॉयज मित्र मंडळाच्या आयोजकांना तसेच ज्यांच्या सहकार्यामळे हे शिबीर यशस्वीरित्या पार पडलं ते “वंचित बहुजन आघाडी वार्ड क्र.28, दलित युथ पॅन्थर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. (133,179,428,502,814), भीमशक्ती मित्र मंडळ, सिद्धार्थ मित्र मंडळ, सिद्धार्थ मित्र मंडळ (कासारे चाळ),नागवंशी सामाजिक सेवा ट्रस्ट या सर्व पक्ष संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अमन आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या…!!

 


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x