कांदिवली लोखंडवाला या ठिकाणी शाहू महाराजांची १५० वी जयंती साजरी
मुंबई, कांदिवली पूर्व
बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणे यासारख्या असंख्य गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी केल्या.*
*वयाच्या २० व्या वर्षी ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक सुधारणा घडवल्या. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती केली व त्याची अंमलबजावणी केली.*
*अशा महान राजाची आज १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन..!
*वंचित बहुजन आघाडी उत्तर मुंबई जिल्हा च्या वतीने कांदिवली लोखंडवाला या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष विशाल पवार, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश अहिरे साहेब, उत्तर मुंबई जिल्हा संघटक नित्यानंद हिरवे, पत्रकार विजय लांडगे, उत्तर मुंबई जिल्हा सहसचिव बबन खरात, जेष्ठ नेते हिरामण जाधव, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पाखरे, विलास सावंत, शेंद्रे, दहिसर तालुका महासचिव धनराज ओठले आदी सर्व मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.





