डॉ. सोनल शुद्धोधन गवई यांना मुंबई विद्यापीठा तर्फे डॉक्टरेट (PHD) पदवी प्रदान…!!


मुंबई : कार्यकारी संपादक विजय उत्तमबाई कांबळे यांच्या लेखणीतून…

मुलाखत : डॉ. सोनल शुद्धोधन गवई

प्रश्न १ : डॉ. सोनल गवई आम्हाला सांगा डॉक्टरेट (PHD) ची डीग्री मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटत आहे?

उत्तर : पीएचडी पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो तसाच मलाही आनंद झाला आहे. नॉर्मल एज्युकेशन मध्ये आणि पीएचडी मध्ये एक मोठा फरक आहे की, पीएचडी मध्ये आपण एक रिसर्च वर्क पूर्ण करत असतो. त्यानंतर त्याच्यातून जो पण इनपुट येतो किंवा आउटपुट हा फक्त आपल्यापुरता नसतो, तर तो सोसायटीला पण एक इनपुट मिळतो. तो माझा रिसर्च वर्क मध्ये मोस्ट ऑफ द पार्ट हा फार्मासिटिकल होता म्हणजे माझ्या रिसर्च मधून जे काही मिळाले त्याचे सोसायटीला किंवा फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे सो त्याचा मला एक वेगळा आनंद आहे.

प्रश्न 2 : डॉ. सोनल गवई तुमच्या संशोधनाचा विषय कोणता आणि त्याचे महत्व काय?

उत्तर : आइसोलेशन, कॅरेक्टरायझेशन, फार्मास्युटिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ पफर फिश फ्रॉम वेस्ट कोस्ट ऑफ मुंबई असा माझा संशोधनाचा विषय होता. म्हणजे पफर फिश सर्वांनाच माहिती असेल मराठी त्याला गेंडा असं बोलतात जी आकाराने फुगलेली असते आणि नॉर्मली ती addible नसते म्हणजे ती आपण खाऊ शकत नाही. ती डेंजरस असते कारण तिच्यामध्ये विष असते. जसे आपण साप मारण्यासाठी सापाचाच उपयोग करून त्याचं औषध बनवतो तसंच इथे मी सापाऐवजी पफर फिश घेतली आहे. तर समुद्रामध्ये खुप असे प्रजाती असतात जे खुप डेंजरस असतात आणि विषारी असतात. त्यातून आपण poisons kills poison म्हणजे “विषानेच विष मारलं जातं” असं आपण बोलतो. तसं त्याच्यातून फार्मासिटिकल मेडिसिन बनवून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दाखवून प्रूफ झालं आहे माझं संशोधनातून की त्या अँटी बॅकटेरिअल, अँटी मायक्रो्बियल, अँटी फंगल, कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा प्रयोग केल्यास त्यावर सुद्धा औषध निर्माण करता येऊ शकतं. शेवटी मला असं रिजल्ट मिळालं की खुप छान अश्या बायोऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत.

प्रश्न ३ : डॉ. सोनल गवई “पफर फिश” या विषयाची निवड का केली? आणि आपले मार्गदर्शक कोण होते?

उत्तर : सर्वात आधी तर खुप अशा प्रजाती होते पण आमच्या मार्गदर्शकांना म्हणजेच प्रो. डॉ. गौतम झोडपे सर यांना वैशिष्ट्यपूर्ण विषय हवा होता. यासाठी त्यांनी पफर फिश ची निवड केली. त्याच्यावर संशोधन फार कमी झालं आहे. मी जी प्रजाती घेतली आहे स्पेसिअली त्याचं नाव आहे “नॅगोसिपालीस स्पेडिसियस”. फिश मध्ये खुप सारे प्रजाती असतात तर जो माझा संशोधनाची प्रजाती होती त्यावर एकच संशोधन पेपर आहे की जे आतापर्यंत समोर आले आहे. त्यानंतर माझा पेपर आहे की ज्याच्या संशोधनातून नवीन मेडिसिन तयार होवू शकतं आणि यावर जास्त संशोधन पेपर नाहीत. म्हणून मी पफर फिश हा माझ्या संशोधनाचा विषय निवडला.

प्रश्न ४ : डॉ. सोनल गवई आपल्या संशोधनाचा समाजाला काय फायदा होऊ शकतो?

उत्तर : पफर फिश हा एक मोठा मासा आहे. सामान्यतः तो खाण्यायोग्य नाही. आपण तो खाऊ शकत नाही, कारण तो विषारी असल्यामुळे धोकादायक आहे. पफर फिशपासून औषधे तयार केली जातात. माझ्या संशोधनातून असे दिसून आले की त्यात प्रतिजैविक (anti-bacterial), प्रतिसूक्ष्मजीव (anti-microbial) आणि प्रतिबुरशी (anti-fungal) गुणधर्म आहेत. मी अशा अनेक चाचण्या केल्या. शेवटी मला आढळले की पफर फिशमध्ये अत्यंत प्रभावी जैव-सक्रिय (bioactive) संयुग आहे. खरं तर, कोणत्याही सजीवामध्ये दोन प्रकारची संयुगे असतात—एक शरीरासाठी उपयुक्त असते आणि दुसरे संरक्षणासाठी असते. पफर फिश खाण्यायोग्य नसल्यामुळे तो सहसा कचरा समजून किनाऱ्यावर टाकून दिला जातो. मी लँडिंग सेंटरमधून पफर फिश घेतला, त्याचे यकृत, आतडी आणि त्वचा वेगळी केली आणि त्यातून जैव-सक्रिय संयुगे शोधली. अनेक चाचण्यांनंतर हे सिद्ध झाले की पफर फिशचा उपयोग औषध म्हणून करता येऊ शकतो. तो अल्झायमर, पार्किन्सन आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

प्रश्न ५ : डॉ. सोनल गवई तुम्हाला संशोधन करताना कोणत्या अडचणी आल्या आणि ते कसे सोडवले?

Advertisement

उत्तर : मला सर्वप्रथम तर संशोधन करायला fellowship मिळाली नव्हती आणि मी विज्ञान शाखेची असल्यामुळे अनेक टेस्टिंग असतात जस कला आणि वाणिज्य या शाखेत theory भाग जास्त असतो पण विज्ञान शाखेला टेस्टिंग शिवाय प्रवेश मिळत नाही. ज्या विषयाच संशोधन करायचं त्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागतात आणि ते सुद्धा आपण ज्या कॉलेज मधुन करतो तेथे सुद्धा संपूर्ण इन्स्ट्रुमेंट नसतात त्यासाठी खुप वेगवेगळ्या ठिकाणी आपले सॅम्पल पाठवावे लागतात. या टेस्टिंगच्या किमती सुद्धा खुप महागड्या असतात. तर मी माझे सॅम्पल आय आय टी मुंबई तसेच पुणे या ठिकाणच्या टेस्टिंग लॅब्सना माझे सॅम्पल पाठवले.
जेथे माझ्या सॅम्पलचा प्रयोग उंदरावर करण्यात आला. त्याच्यावर काही बदल होतात का ते बघून मला पुढे संशोधन करायला प्रवेश मिळाला. यात मी 5 लाख रुपये शैक्षणिक कर्ज सुद्धा काढलं आणि माझं संशोधन पूर्ण केलं.

प्रश्न ६ : डॉ. सोनल गवई अर्नाळा बीचचे संशोधनात काय महत्त्व आहे?

उत्तर : अर्नाळा बीच सागरी जैवविविधतेने समृद्ध आहे. तेथून मिळालेल्या नमुन्यांमुळे स्थानिक सागरी जीवांचा औषधी अभ्यास करता आला.

प्रश्न ७ : डॉ. सोनल गवई भारतातील सागरी औषध संशोधनाचे भवितव्य कसे पाहता?

उत्तर : भारताची किनारपट्टी मोठी असून जैवविविधता प्रचंड आहे. योग्य संशोधनाला प्रोत्साहन दिल्यास भारत या क्षेत्रात अग्रगण्य ठरू शकतो.

प्रश्न ८ : डॉ. सोनल गवई संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला संदेश काय आहे?

उत्तर : सशोधनाची आता काळाला इतकी गरज आहे की, कारण इतके नवीन आजार तयार होतं आहेत आणि त्या आजारानावर अजूनही औषध बनवण्याचे संशोधन झाले नाही. जसे कोविडच्यावेळी वैक्सीन बनायला वेळ लागला तसंच संशोधनात इतकं शिक्षण्यासारखं आहे की, समुद्रामध्ये इतके प्राणी आहेत की ज्यांच्यावर संशोधन करून आपण नवीन औषध निर्मिती करू शकतो. म्हणून भविष्यात संशोधनासाठी खुप वाव मिळू शकतो, कारण आपण संशोधन केवळ थेअरॉटिकल करत नाही. तर प्रॅक्टिकली सुद्धा करतो. आपल्या संशोधनातून आपलं प्रूफ राहतं ज्यामुळे समाज जिवन सबळ करण्यात आपलाही हातभार आहे याचा आपल्याला आदर वाटतो.

प्रश्न ९ : डॉ. सोनल गवई आपल्या पुढील वाटचालीबाबत आपले काय नियोजन आहे किंवा या पुढे आजून आपण शिकणार आहात काय?

उत्तर : माझं संशोधन हे आजून ट्रायल म्हणून नाही वापरला गेला की माझ्या पफर फिश मध्ये जे बियोॅक्टिव्ह कंपाऊंड आहेत जे की या आजारावर उपयोगी पडू शकतात. तर मी नक्कीच माझ्या संशोधनाचा उपयोग सोसायटीसाठी होईल, फार्माकॉलॉजिसाठी आणि फार्मासिटिकल इंडस्ट्रीसाठी होईल आणि मला पुढेही शिकायला आवडेल जर का मला चांगले मार्गदर्शक मिळाले आणि fellowship मिळाली की मी नक्कीच पोस्ट डॉक्टरेट सुद्धा पूर्ण करीन.

प्रश्न १० : कोणाबद्दल विशेष आभार व्यक्त कराल आणि का?

उत्तर : सर्वात आधी मी माझ्या आईचं नाव घेईन आणि जेव्हा मी पीएचडी ची सुरुवात केली तेव्हा माझे माझे बाबा सुद्धा माझ्या सोबत होते. लग्नानंतर तसं मुलींना शिकणं जरा अवघड होऊन जातं, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात जसं की मुलींनी काय गरज आहे लग्नानंतर शिकण्याची परंतु माझं सासर हे अजिबात असं नाही. तर उलट माझ्या सासूबाईंनी मला खुप मदत केली जसं की माझ्या पाच वर्षाच्या मुलाला सकाळीच त्यांच्याकडे सोडून मला कॉलेजला जावं लागायचं. कारण मी विवा कॉलेजला शिकवायला जायचे आणि त्यानंतर पाटकर कॉलेजला माझ्या संशोधनाचा अभ्यास करायला जावं लागायचं ज्यात माझा संपूर्ण दिवस बाहेरच जायचा. मला घरी यायला संध्याकाळी 6 वाजायचे. माझे सासरे सुद्धा पोलीस प्रशासनात असल्यामुळे त्यांनीही मला शिक्षण्यासाठी पाठिंबा दिला यासोबतच माझे पती हे सुद्धा संशोधनासाठी कोठे जायचं असेल तर नेहमीच ते सोबत असायचे. ते सुद्धा प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते त्यांचं काम सांभाळून त्यांनी मला खुप साथ दिली कारण संशोधन करताना खुप त्रास होत असतो कारण अनेक वेळा संशोधन करावं लागत असल्यामुळे त्यासाठी फिरावं लागतं तेव्हा जोडीदारची साथ खूपच महत्वाची होती.

खुप छान वाटलं आपण ज्या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली त्या विषयावर आपल्यासोबत चर्चा करून आपण असेच आजून पुढे शिकत रहावं आणि नवनवे संशोधन करत राहावं ज्याचा उपयोग सामाजिक स्थर उंचावण्यासाठी होत राहील.

माझ्याकडून आणि निर्भीड समाचार कडुन आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x