वर्धापनदिन विशेष
तर ही गोष्ट सुरू होतेय, २०२० च्या कोविड काळापासून, टीम अनुदत्त कट्टा म्हणजेच आपल्या शाळेतून २००७ मध्ये दहावी पूर्ण केलेल्या बॅचमधील विद्यार्थ्यांपासून…
हे विद्यार्थी काहिनाकाही बहाण्याने एकमेकांना भेटत असायचे आणि त्यातही जॉब मधून वेळ काढून ट्रिप सुद्धा प्लान करत होते.
त्यांच्या प्रत्येक वेळेसच्या भेटी मध्ये एक टॉपिक नेहमीच कॉमन राहिलेला आहे, तो म्हणजे शिक्षकांसोबत गेट टू गेदर आणि ते ही फक्त त्यांचीच बॅच नाही, तर दहावीच्या पहिल्या बॅच पासून म्हणजे १९९५ पासून ते आतापर्यंतच्या सर्व बॅचेस व तुकड्या…!
पण त्यांच्यासमोर अडचण एकच की एवढ्या सगळ्या बॅच च्या विद्यार्थ्यांना कस शोधायचं आणि काय सांगून एकत्र करायचं, शिवाय ते त्यांचं का ऐकतील ? आणि का भेटतील ? असे बरेच प्रश्न मनात उपस्थित राहिले. तरी त्या मुलांनी धाडस केलं, एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणूनच त्यांनी एक मेसेज बनवून दि. २२ जुलै २०२० रोजी सोशल मीडियावर फिरवला, त्यांनी प्रथमतः त्यांच्या बॅच च्या सगळ्या मित्रांना तो मेसेज शेअर करायला लावला. फेसबुकवर त्या मेसेज वर ५० पेक्षा जास्त कॉमेंट्स आले, तेव्हा त्यांचा थोडा आत्मविश्वास वाढला म्हणून पुढे काय ? त्यासाठी त्यांनी व्यवस्थित रूपरेषा बनवून घेतली.
वर्षभर एकमेकांच्या भेटी घेऊन, ही संकल्पना काय आहे ? त्याबद्दल परिपूर्ण माहिती सर शिक्षकांना – माजी विद्यार्थ्यांना फोन वर समजवून सांगितली.
आणि मग दि. २३ मे २०२१ रोजी *माझी शाळा* या नावाने व्हाटस अँप ग्रुप तयार झाला. पण त्याआधी आपल्या शाळेच्या नावाने असलेला फेसबुकवरील ग्रुप आधीच ” दिलीप मर्चंडे ” चालवत होते. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी उषा पवार आणि दीपक वाल्हे ह्यांनी दिलीप मर्चंडे ची भेट घेऊन त्यांना पूर्णपणे कल्पना दिली आणि ते सगळेजण एकत्र त्या ग्रुपला वाढविण्यासाठी सोबत काम करू लागलो.
बोलतात ना, तुमच्या मध्ये जर तो स्पार्क असेल, तर अशक्य गोष्टी ही, सहज शक्य होतात फक्त सोबतीला त्याच ताकदीचे हात आणि विचारांची साथ हवी आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला आपल्या ह्या ” माझी शाळा ” ग्रुपमधून भेटत राहिल्या. त्यामध्ये विशेषतः काही जणांची नावे आवर्जून घ्यावीशी वाटतात ती म्हणजे अभिजित पाळेकर, प्रज्योत कदम, दिलीप मर्चंडे, विजय मर्चंडे आणि दुबई हुन नेहमीच आमच्या संपर्कात असणारे भारत गवळी ह्या सगळ्यांचा सपोर्ट आणि सकारात्मक विचार योग्य वेळी आम्हाला मिळत राहिले. सुरुवातीला ह्या सिनियर विद्यार्थी मित्रांकडून खूप सहकार्य लाभले. सोबतीला साईनाथ वाघमारे आणि दीपक वाल्हे तर नेहमीच तयारीत असतात.
त्यानंतर एकमेकांच्या ओळखीने आम्ही नवीन मित्र जोडत गेलो, त्यात रवींद्र पंदारे, संतोष स्वामी, विजय सोमासे, प्रकाश शिंदे, दीपक पाडावे, राजन मांजरेकर, विकास झाकडे, सिद्धार्थ गायकवाड, समाधान कांबळे, विकास कांबळे, विजय कांबळे, आकाश म्हात्रे, प्रदीप देवळे, रत्नदीप लव्हाळे, मनोज झाकडे, सुनील शिंदे, प्रशांत कांबळे, प्रवीण खाडे, प्रकाश गायकवाड, किशन गायकवाड, प्रतीक वानखेडे, महेंद्र करंबे, प्रकाश काळे, सचिन कांबळे, सतीश जाधव इ. असे बरेच माजी विद्यार्थी जोडले गेले.
तर मुलींमधून मानसी सावंत, सुजाता देवरूखकर, रेखा माळदकर, विद्या मर्चंडे, निर्मला गायकवाड, मेघना सुतार, शेवंता, ममता महिंद्रकर, सुरेखा गायकवाड, मुदिता पवार, मानसी गुरव, राधिका महिंद्रकर, स्वाती केसरकर, ऍड. प्रणाली पाते, दिक्षिता पासलकर, बबिता, सुरवसे, प्रियंका दुनघव,.. बघता बघता ग्रुप वाढला.
एकीकडे ग्रुप वाढत गेला आणि एकीकडे छोटेखानी उपक्रम सुरू ठेवले. त्यातले काही उपक्रम पुढीलप्रमाणे
१) आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी डॉ. विनोद जाधव ह्यांनी ” कोरोना काळातील आरोग्यविषयक जनजागृती ” ह्या विषयावर फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले होते..
२) विभा देशपांडे मॅडम ह्या मानसोपचारतज्ञ आहेत त्यांनी ” कोरोना काळातील मानसिक स्वास्थ्य ” ह्या विषयावर फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले होते.
3) सौरभ सावरकर सर हे रवीनंद अकादमी चे संस्थापक आहेत त्यांनी ” स्पर्धा परीक्षा आणि करियरच्या संधी” ह्या विषयावर फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले होते.
४) अभिजित पाळेकर, आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी ह्यांनी ” आजच्या आणि भविष्यातील करियरची संधी ” ह्या विषयावर झूम अँप द्वारे मार्गदर्शन केले होते.
५) डॉ. सरिता यादव ह्यांनी ” निरोगी जीवनासाठी Homeopathy ” ह्या विषयावर फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले होते.
६) भारत गवळी, आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी ह्यांनी ” करियर ऑप्शन विथ इंडस्ट्रीअल रिव्हॉल्युशन 4.0 ” ह्या विषयावर फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले होते.
त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांची एकमेकांसोबत ओळख आणि मैत्री होण्यासाठी एकदिवसीय सहल सुद्धा आपल्या माझी शाळा ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली होती..
१) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, ७ ऑगस्ट २०२२ रोजी हा मैत्री दिवस बघून त्या दिवशी छोटेखानी स्नेहभेट आयोजित केली गेली.
२) विसावा रिसॉर्ट, विरार ला पुन्हा सहल काढण्यात आली
३) शिक्षक विद्यार्थी स्नेहभेट सोहळा २०२३, आपल्याच शाळेत मा. रामचंद्र आदावळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला.
४) पुन्हा ७ ऑगस्ट २०२३ रोजी मैत्री दिवस निवडून कोंडीवते लेणीवर सहल आयोजित करून भेट ठरली.
५) जानेवारी महिन्यात म्हणजे ७ जानेवारी २०२४ रोजी माझी शाळा ग्रुप तर्फे आजी माजी विद्यार्थ्यांसाठी मैत्री चषक नावाने क्रिकेट सामना आयोजित केला होता.
६) शिक्षक विद्यार्थी स्नेहभेट सोहळा २०२४
७) वृक्षारोपण अभियान वर्ष पहिले
ग्रुपला अजून नेक्स्ट लेव्हल ला घेऊन जाण्यासाठी आपण सध्याच एक सदस्य नोंदणी फॉर्म तयार केला आहे. या फॉर्मद्वारे माझी शाळा समूहातील सर्व सदस्यांची प्राथमिक माहिती तसेच त्यांचे व्यवसाय किंवा नोकरी संदर्भातील माहिती गोळा केली जाईल. या माहितीचा उपयोग भविष्यकाळात सर्वांसाठी होईल, ज्यामुळे एकमेकांना विविध प्रसंगी आणि क्षेत्रात सहाय्य करता येईल.
तर अश्याप्रकारे छोटे – मोठे उपक्रम आपण माझी शाळा, माजी विद्यार्थी ग्रुपतर्फे राबविण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो… सुरुवातीला ६ असणारे माजी विद्यार्थी आज ६०० च्या वर जोडले गेलेले माजी विद्यार्थी हे सगळे आज माझी शाळा ह्या व्हाट्स अँप च्या ग्रुप मध्ये एकमेकांशी हितसंबंध जोडून आहेत.
पुनः एकदा त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आभार ज्यांनी वेळीवेळी एकमेकांना सहकार्य केले, असेच एकमेकांसोबत रहा मित्रांनो…
पुन्हा एकदा सर्वांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.





