कांदिवली पूर्वेच्या चाळीत भीषण आग; 7 जण होरपळले; 6 महिलांचा समावेश, तिघींची प्रकृती चिंताजनक..!!
मुंबई : कांदिवली पूर्वेला मिलिटरी रोड, आकुर्ली क्रॉस रोड क्रमांक ३, राम किसन मेस्त्री चाळ, येथील एक मजली चाळीतील पहिल्या मजल्यावरील दुकानाला सकाळी साडेनऊच्या सुमारासला भीषण आग लागली. या आगीत सात जण होरपळले असून यात सहा महिलांचा समावेश आहे. यामधील ३ महिला सरासरी ९० टक्के भाजल्या आहेत.
रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांना तातडीने भाभा हॉस्पिटलसह अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही आग विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, खाद्यपदार्थ, एलपीजी सिलेंडर, मुख्य व्हॉल्व्ह, गळती झालेले एलपीजी गॅस, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह आदीला लागली होती.
इ.एस.आय.सी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या महिलांमध्ये शिवानी गांधी (वय-५१ वर्षे) ७०%, नितू गुप्ता (वय- ३१ वर्षे) ८०% , जानकी गुप्ता (वय- ३९ वर्षे) ७०% भाजले गेल्या आहेत. तर मनराम कुमकट (वय ५५ वर्षे) या ४०% भाजल्या गेल्या आहेत. भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्यांमध्ये रक्षा जोशी (वय – ४७ वर्षे) ८५ ते ९०% भाजले, दुर्गा गुप्ता (वय-३० वर्षे) ८५ ते ९०% भाजले, तर पूनम (वय २८ वर्षे) ९०% भाजल्या गेल्या आहेत.





