‘भारत विकास परिषद’ मुंबई तर्फे नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचा उपक्रम..!!
मुंबई : भारत विकास परिषद मुंबई यांच्या तर्फे भारतमाता विद्यालय, क्रांती नगर, कांदिवली पूर्व या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी आणि मोफत मोती बिंदू ऑपरेशनचा उपक्रम रविवार दिनांक ०१ जून २०२५ रोजी राबविण्यात आला. या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने विभागातील नागरिकांनी घेतला.

अभिनव खुरदिया हे या कार्यक्रमाचे संयोजक होते. तसेच भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सत्यप्रकाश नाटाणी, सचिव जितेंन्द्र तापडीया, कोषाध्यक्ष गिरीश रायपुरिया आणि महिला उपाध्यक्ष सुधा मिश्रा जी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी भारतमाता विद्यालयाचे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. सम्रतराव कांबळे सर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. शाळेचे ट्रस्टी श्री. सुचित कांबळे, सचिन कांबळे, भारतमाता विद्यालयाचे मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. नामदेव ढवळे सर तसेच शाळेचा कर्मचारी वर्ग यांनी देखील सहकार्य केले. तसेच श्री. पंकज सिंह, श्री, महेश निडवंचे आणि देऊसारा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. नितेश अंभुरे यांनी देखील लोकांमध्ये जनजागृती करून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी केली.





