अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांचे तात्काळ कारवाईचे आदेश..!!


मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या तत्वांचे पालन करत व्यापक कारवाई करा असेही त्या म्हणाल्या. न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना चित्रीकरण करणे आणि अन्य मार्गदर्शक तत्वांचे पालन करत व्यापक कारवाई करावी. तसेच अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईत कोणतीही हयगय करू नये असेही आदेश देण्यात आले आहे. शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात त्यांनी बुधवारी मुख्यालयात आढावा घेतला. यावेळी सहआयुक्त विश्वास शंकरराव, सहायक आयुक्त विनायक विसपुते, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन, शहर) मृदुला अंडे उपस्थित होत्या.

Advertisement

शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांविरोधात केल्या जात असलेल्या कारवाईचा आढावा घेतल्यानंतर अश्विनी जोशी म्हणाल्या की पावसाळ्यापूर्वी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. जानेवारी ते मार्च २०२५ च्या दरम्यान करण्यात आलेल्या निष्कासनाच्या कारवाईचा वेग अधिक तीव्र करावा. संबंधित प्रशासकीय विभागाने करनिर्धारण विभागाला अनधिकृत बांधकामांची सविस्तर माहिती देऊन संबंधित बांधकामांवर त्वरित दंडाची आकारणी करून घ्यावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!