बृहन्मुंबई वॉर्ड क्र.३९ मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम, जनसमुदाय आंदोलनाच्या पवित्र्यात.*
मुंबईतील क्रांतीनगर आणि गोकुळ नगर क्षेत्रात पाणीपुरवठ्याच्या कमी दाबाची समस्या सतत वाढत आहे. या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे. स्थानिक रहिवाशांनी या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या कित्येक वर्षा पासून हा प्रश्न सतावत आहे, शिवाय सध्या नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे, लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सध्याच्या परिस्थितीचा निषेध म्हणून, ३००० हुन अधिक लोकांनी पी नॉर्थ कार्यालयात एक मोठे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन लवकरच होणार असून, या समस्येवर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
स्थानीय रहिवाशांचे म्हणणे आहे की, कमी दाबाच्या पाण्यामुळे घरगुती आणि व्यवसायिक वापरासाठी पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या जीवनावर आणि व्यवसायावर होत आहे.
या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी बीएमसीने संबंधित विभागांना सूचना देऊन नागरिकांची अडचण दूर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.





