कांदिवलीत उद्या समता मेळावा…!!
विजय उत्तमबाई कांबळे :
“संविधान संवर्धन समितीच्या “ वतीने कांदिवलीतील वस्ती पातळीवर गेली २ वर्षे २६ नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण कांदिवलीत संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी “संविधान दिन” आणि “महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिन‘” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत “समता सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संपूर्ण सप्ताहात ठिकठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. समता सप्ताहाची सांगता “रेला अखिल भारतीय लोकशाही सांस्कृतिक मंच” द्वारा सांस्कृतिक कार्यक्रमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत होणार आहे.
भारतातील अनेक राज्यातून आलेले शाहीर, गायक हे या ठिकाणी येऊन समतेच्या विचारांची पेरणी करणार आहेत. तर समतेची बीजे पेरता पेरता काही बीजे आपल्याला देतील ती आपण आपल्या बुद्धीच्या शेतीत रुजवायला नक्कीच घेऊन जा आणि समता मूलक समाज निर्माण होईल यासाठी त्याला सतत समतेच्या विचारांचे पाणी देत रहावं. हाच बोध या कलाकारांकडून मिळणार आहे.
सर्वांनी या कार्यक्रमाला एकत्र येत समतेचे वाटेवरचे सोबती होऊया आणि स्त्री, दासी, जाती, वर्ग, वर्ण व्यवस्था अंत:कडे वाटचाल करूया.




