अनुदत्त विद्यालयाच्या “माझी शाळा माजी विद्यार्थी” तर्फे ‘भारतीय रेल्वे’ पद भरतीच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
माझी शाळा माजी विद्यार्थी’ आयोजित ‘भारतीय रेल्वे पद भरतीचे सविस्तर सखोल मार्गदर्शन शिबीर’ अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कांदिवली पूर्व, मुंबई येथे दिनांक ०८/०२/२०२५ रोजी संप्पन झाले. ह्यात कांदिवली, मालाड, गोरेगाव पूर्व विभागातील तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला.
रेल्वे भरती प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, ऑनलाइन परीक्षेत येणाऱ्या अडचणी याबाबत दैनिक लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स यांनी गौरवलेले तज्ञ मार्गदर्शक श्री.विष्णू बाळ धुरी सर ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम अनुदत्त विद्यालय, उज्वल शिक्षण संस्थेचे संचालक श्री. रामचंद्र आदावळे सर ह्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला. तसेच हा शिबीर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, त्यासाठी युट्यूब लाईव्ह द्वारे प्रसारित करण्याची जबाबदारी श्री. साईनाथ वाघमारे ह्यांनी घेतली होती व ती त्यांच्या युट्यूब चॅनेल (Grow with Sainath) द्वारे पूर्ण केली. त्याचबरोबर माझी शाळा माजी विद्यार्थी ग्रुप तर्फे पुढील कार्यक्रम हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा बाबत थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर आयोजक माजी विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.




