निद्रानाशावर उपाय :
बर्याच लोकांना अल्प मुदतीचा निद्रानाशाचा त्रास जाणवतो. या सामान्य झोपेचा त्रास, झोपेतून उठणे आणि जागे होण्याची वेळ होईपर्यंत झोपेत राहणे कठीण करते. जरी आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते, तरीही बहुतेक प्रौढांना रात्री किमान सात तास झोपेची आवश्यकता असते.
१. सकाळी उठल्यावर व संध्याकाळी रिकाम्या पोटी कमीत कमी ३०-३५ मिनिटे फिरायला जाणे.
२. दिवसा झोपू नये.
३. सकाळ संध्याकाळ भ्रा म री प्राणायाम , शवासन, योगनिद्रा करावी.
४. संध्याकाळच्या वेळेस चहा, काॅफी यासारखी उत्तेजक पेय टाळावी.
५. पादाभ्यंग – रात्री झोपताना तळपायाला तेल किंवा तूप लावून मालीश करावी.
६. शिरोधारा – शिर म्हणजे डोके, शिरोधारा म्हणजे डोक्यावर औषधी तेलाची पातळ धार सोडणे. जसे महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो त्याप्रमाणे. यामुळे मानसिक संतुलन चांगले राहते, डोके शांत होते व झोप लागते आणि उत्साहही वाढतो. ही क्रिया एखाद्या वैद्याकडे जाऊन करावी.
७. रात्री झोपताना म्हशीचे दुध १-२ चमचे तूप टाकून प्यावे. म्हशीचे दूध नसेल तर गाईच दुध प्यावे.





