पीडितांना न्याय मिळवून देण्यास सदैव तत्पर : Adv. दीपक जगदेव
मुंबई, प्रतिनिधि नितेश मगर : कांदिवली पूर्व
क्रांती नगर-गोकुळ नगर परिसरात एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहिती नुसार एका बौद्ध कुटुंबातील महिलेच्या नावाचे बनावट कागदपत्रे बनवून २०१७ साली सदर महिलेच्या घरावर काही भामट्यांनी कब्जा केला होता.
या संदर्भातील माहिती परिसरातील सामाजीक कार्यकर्ते आणि व्यवसायाने वकील असलेले Adv. दिपक जगदेव यांना समजताच त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करत पीडित बौद्ध महिलेला आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यास मदत केली.
Adv. दीपक जगदेव यांनी आरोपी विरोधात कुरार पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून, सदर आरोपी हा फरार असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
समाजात होत असलेल्या अन्याया विरुद्ध वारंवार आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य Adv. दीपक जगदेव यांनी केले आहे.





