विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा देगलूर दौरा; भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट..!!


बातमी : निर्भीड समाचार न्यूज डेस्क

देगलूर : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) श्री. शहाजी उमाप साहेब हे देगलूर दौऱ्यावर आले असता, भारतीय जनता पार्टी देगलूर शहर शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शहराच्या सुरक्षेबाबत आणि विविध प्रलंबित मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, डी.वाय.एस.पी. साकेत गोसावी आणि पोलीस निरीक्षक मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप शिष्टमंडळाने आयजी उमाप साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. उमाप साहेबांनी देखील या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Advertisement

भाजप शहर सरचिटणीस श्री. दीपक संगमकर यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने उमाप साहेबांची भेट घेऊन शहराच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

आयजी उमाप साहेबांनी सर्व मुद्दे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x