वडारपाडा परिसरातून गर्दुल्ले व समाजकंटकांचा नायनाट करणार; स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांची संयुक्त बैठक..!!


बातमी : निर्भीड समाचार न्यूज डेस्क

मुंबई (समता नगर): वडारपाडा, दुर्गामाता चाळ आणि परिसरातील वाढत्या अमली पदार्थ सेवन (गर्दुल्ले) आणि समाजकंटकांच्या त्रासाला कायमचा आळा घालण्यासाठी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. समता नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदजी चिमडा यांच्यासोबत या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून परिसरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांमुळे आणि उघड्यावर बसणाऱ्या गर्दुल्ल्यांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते. या समस्येचे गांभीर्य ओळखून नगरसेवक सचिन पाटील आणि युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर यांच्या पुढाकाराने ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचे आश्वासन
या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदजी चिमडा यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली.

Advertisement

या बैठकीला नगरसेवक सचिन पाटील, युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक शेखरशेठ चव्हाण, शाखासमन्वयक बबन गावडे, युवासेना शाखाधिकारी सचिन भुवड, कार्यालयप्रमुख धोंडीबा लोटेकर, उपशाखाप्रमुख महादेव येटेकर, जावेद मुजावर, मांदारेजी यांच्यासह वडारपाडा दुर्गामाता चाळ परिसरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केवळ पोलीस कारवाई करून ही समस्या सुटणार नाही, तर नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या परिसरात अशा काही हालचाली घडल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले. सर्वांच्या एकजुटीने हा परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x