अनुदत्त विद्यालयाचे शिक्षक प्रकाश डांगे यांच्या कन्या अनघा डांगे यांची एम.एस. (ENT) साठी निवड..!!


मुंबई,कांदिवली : “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा…” या उक्तीप्रमाणे पिढ्यानपिढ्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकाच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. अनुदत्त विद्यालयातील नामांकित शिक्षक श्री. प्रकाश डांगे यांच्या कन्या अनघा प्रकाश डांगे यांची एम.एस. (ENT – कान, नाक, घसा तज्ज्ञ) या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्यामुळे या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

प्रकाश डांगे सर अनेक वर्षांपासून अनुदत्त विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या अनघाने लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य ठेवले होते. एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, तिने देशपातळीवरील कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून मास्टर ऑफ सर्जरी (MS) या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश निश्चित केला आहे.

Advertisement

अनघा हिने सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य राखले होते. तिने मिळवलेले हे यश तिच्या कठोर परिश्रमाचे आणि जिद्दीचे फळ असल्याचे बोलले जात आहे. प्रकाश डांगे यांची सुकन्या असलेल्या अनघाच्या या यशामुळे डांगे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल स्थानिक मान्यवर, मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x