ठाण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त; वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!


ठाणे/मुंबई : निर्भीड समाचार News Desk

ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी हिंदी वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेली अभिनेत्री ग्राहकांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधत असे. ती टीव्ही कलाकार आणि मॉडेल पुरवण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून २५,००० रुपयांची मागणी करत असे. यातील १५,००० रुपये ती स्वतःकडे कमिशन म्हणून ठेवत होती, तर उर्वरित १०,००० रुपये पीडित मुलींना दिले जात होते.

Advertisement

वागळे इस्टेटमधील एका हॉटेलमध्ये हा व्यवसाय सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक (Decoy Customer) पाठवून या अभिनेत्रीशी संपर्क साधला. जेव्हा ती अभिनेत्री दोन महिलांसह हॉटेलमध्ये पोहोचली, तेव्हा दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. चौकशी दरम्यान अभिनेत्रीने कबुली दिली की, अभिनय क्षेत्रात नियमित काम मिळत नसल्यामुळे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने या अवैध व्यवसायाचा मार्ग स्वीकारला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या अभिनेत्रीविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलिसांच्या या कारवाईमुळे ग्लॅमर जगतातील काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x