“विकासासोबतच स्वच्छतेचा ध्यास; नगरसेवक सचिन पाटील यांच्या पुढाकाराने कांदिवली पूर्व येथे स्वच्छतेचा जागर”


कांदिवली: मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक २९ अंतर्गत येणाऱ्या बाणडोंगरी आणि दामोदरवाडी परिसरात नुकतेच विशेष स्वच्छता व साफसफाई अभियान राबविण्यात आले. स्थानिक नगरसेवक सचिन पाटील यांनी केलेल्या मागणीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.पावसाळा आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी नाल्यांची सफाई, कचरा उचलणे आणि औषध फवारणी यांसारखी कामे पूर्ण केली.

Advertisement

याप्रसंगी बोलताना नगरसेवक सचिन पाटील म्हणाले की, “आपला परिसर कायम स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी मी कटिबद्ध आहे. स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने यापुढेही अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने केले जातील. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे.” या मोहिमेत मुंबई महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सचिन पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी बोलताना नगरसेवक सचिन पाटील म्हणाले, “प्रभाग २९ हा एक आदर्श प्रभाग बनवणे हे माझे ध्येय आहे. प्रशासकीय स्तरावर स्वच्छता कायम ठेवली जाईलच, पण नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे.”

शिवसेना (UBT) पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सचिन पाटील यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, या स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x