समाजातील वास्तवाची मांडणी करणारा चित्रपट म्हणजे *जय भीम पॅन्थर*..!!
मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे

काल 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…!!
समाजात जयंतीच्या आनंदात आणखीन भर पडावी म्हणून *जय भीम पॅन्थर* हा सिनेमा 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील अनेक चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झाला.
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, मार्केटिंग टीमने तसेच या चित्रपटच्या नावाच्या प्रेमात पडलेली काही सामाजिक कार्यकर्ते, धम्म उपासक व कलाकारांचे,दिग्दर्शकांचे मित्रपरिवारातील मंडळी सुद्धा प्रचार करतच होती आणि तेही जानेवारी 2025 पासून पण मी काल सिनेमा बघायला गेलो अनेक मित्र सोबत जावू म्हणणारे पण दरवर्षी जयंती साजरी करण्यात ते पुढे असल्या करणास्तव जर अद्याप गेले नसतील, तर त्यांनी आज, उद्या, परवा, तेरवा 2 तासाचा वेळ काढून हा चित्रपट बघितला पाहिजे.
याचं कारण मित्र मंडळ, संस्था, संघटना उभी करण्याची सुरुवात ज्यांनी ज्यांनी केली असेल आणि काही काळ ज्यांनी प्रामाणिक काम केलंय त्यांना हा चित्रपट नक्कीच आपला वाटेल यात मला तरी शंका नाही.
पण एखादा मित्र, नातेवाईक, शेजारी हा चित्रपट बघून आल्यावर जर त्याला तो चित्रपट नसेल आवडला म्हणून तो तुम्हाला म्हणतोय की चित्रपट एवढा काही मजेदार नाही मग आपण लगेच आपलं मत बदलून चित्रपट गृहाकडे जाणारे पाय मागे वळवतो आणि गप्प घरी निघून जातो.
पण समाजात तुम्हाला खरंच बदल घडवून आणायची इच्छा आहे सोबत काही मित्रमंडळी आहेत पण काहीही घडताना दिसत नाही. म्हणून आपण अनेकदा चळवळ वैगरे झूट आहे म्हणून सगळं सोडून बसतो, का बसतो, काय काय घडत आपल्या सोबत यावर जिवंत चित्रण करणारा चित्रपट म्हणजे *जय भीम पॅन्थर*
पण मराठी चित्रपट प्रेक्षकांच नेमकं झालंय काय तर, त्यांना एखादा टाईमपास करणारा चित्रपट असला तरी चालेल. ज्या स्टोरीचा खरं पाहता आपल्या जीवनाशी, जगण्याचा मरण्याचा संघर्षाशी काहीही लेन देणं नसूद्या तो चित्रपट हिंदीत असेल कलाकार तगडे आहेत एवढ्यावरच तो चित्रपट बघायला जातात कारण त्यात एखाद दोन आयटम सॉंग असतात. त्यात ऍक्शन सीन हे *VFX* चा फायदा घेऊन बनवतात. ज्याला आपण सब झुट हैं असं मनू शकतो.
पण मराठी प्रेक्षकांना चित्रपट म्हणून बघायची सवय नाही.
नावावरूनच त्या चित्रपटाची जात दिसून येते. म्हणजे हा चित्रपट कोणत्या जातीच्या अंगाने बनला असेल हे गृहीत धरून अनेकजन बायकॉट करून टाकतात.
ज्यांच्या आयुष्यावर, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याचं सरळ सरळ परिणाम होताना *जय भीम पँथर* या चित्रपटात *दिग्दर्शक निशांत धापसे* यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण ज्या समाजाच्या व्यथांवर हा संपूर्ण चित्रपट बनवला गेलाय तो समाज मात्र अजूनही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून चित्रपट गृहात जात नाही आहे.
यातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. अनेक ठिकाणी हसवणारा, मध्ये मध्ये रडवणारा आणि शेवटी आपलंस वाटणारा *जय भीम पॅन्थर* हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी बघावा असच चित्रपट आहे. मग तो कोणत्याही जाती पातीचा असो. त्याला हा चित्रपट नक्की आवडणार पण त्याला समजपरिवर्तन अपेक्षित असेल, समता मुलक समाज अपेक्षित असेल, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महापुरुष ज्याला आपले वाटतात त्या प्रत्येक तरुण तरुणीनी *जय भीम पॅन्थर*
बघितला पाहिजे असं काल चित्रपट बघून सांगावस वाटलं…!!
*जय भीम पँथर*
*निशांत धापसे*
*सिद्धार्थ प्रतिभावंत*
*प्रविण डाळिंबकर*
*विनय धाकडे*




