क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा उभारण्याची नागरिकांची संकल्पना..!!
मुंबई : क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ या ठिकाणच्या मध्यभागी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभारण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यासंबंधी लागणाऱ्या सर्व परवानग्या कायद्याला अनुसरून महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्याकडून घेऊ असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
Advertisement
यामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थभाव किंवा राजकीय हेतू नाही असे देखील त्यांचे म्हणणे आहे. प्रतिमा कशा प्रकारे असेल याचाही आराखडा नागरिकांकडून तयार करण्यात आला आहे.
क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड याठिकाणच्या मध्यभागी बाबासाहेबांची प्रतिमा उभारण्याच्या संकल्पनेला सर्वांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना सत्यात उतरवावी असेही काहींचे म्हणणे आहे.




