बोरीवली पश्चिम येथील भंगारच्या गोदामाला आग..!
मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथील न्यू लिंक रोडवरील गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक 7 आणि 8 येथे असलेल्या प्लास्टिक व भंगार साठवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली.
Advertisement
तत्काळ MHB पोलीस, स्थानिक पोलीस तसेच फायर ब्रिगेड यांनी घटनास्थळी धाव घेत वेगवान आणि प्रभावी कार्यवाही करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
घटना स्थळी माजी आमदार श्री. विनोद घोसाळकर तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्वरित हजर राहून आवश्यक समन्वय व सहकार्य करत होते.





