मनोज जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चार जूनपासून उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. येत्या चार जून रोजी नारायण गडावर सभा घेतल्यानंतर उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे म्हणाले. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कुणाचाही प्रचार केला नाही किंवा कुणाला निवडून आणण्याचे आवाहन देखील आम्ही केलेलं नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं. कोणाला पाडायचं हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या. जर दिलं नाही तर विधानसभेच्या २८८ जागांमध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढवणार, असंही जरांगे म्हणालेत. मराठा आणि कुणबी एकच आहेत तसेच सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणीचा कायदा जर पारीत केला नाही, तर मी मैदानात जाणार आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही, असंही जरांगेंनी म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की चंद्रकांत पाटलांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे. त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार केले. फडणवीस यांनी असे लोक सांभाळल्यामुळे मोदींवर ही वेळ आली आहे. यामुळे मोदींना सोलापूर मध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या.





