होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भुजबळांचे उद्धव ठाकरेंना समर्थन


मुंबईत काल झालेल्या अवकाळी पावसामुळे भलं मोठं होर्डिंग पडल्याने दुर्देवी घटना घडली. त्या होर्डिंगखाली तब्बल १०० लोकं अडकली होती. त्यातील काहींना बाहेर काढण्यात यश मिळालं. तर काही त्यातच अडकून पडले. तर यामध्ये जवळपास १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तसेच यावेळी सरकारनेच महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. जे होर्डिंग पडलं होतं, त्या कंपनीचे मालक आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यावर भाजपने उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं आहे. मात्र आता अशातच महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

यावेळी बोलत असताना भुजबळ म्हणाले सरकार आमचं, महानगरपालिका आमची, याप्रकरणात उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असं म्हणत छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. होर्डिंग असलेला कंपनीच्या मालकाचं नाव हे भावेश भिडे आहे. भावेश भिडे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो भाजप नेते राम कदम यांनी शेअर केले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर खापर फोडण्यात आलं. मात्र भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजून वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा पाहायला मिळत आहे.

मुंबईत जाताना असे अनेक बेकायदेशीर होर्डिंग दिसतात. त्यांचं वजन देखील अधिक आहे. हे सर्व अनधिकृत आहे. त्या होर्डिंगची चोकशी झाली पाहिजे. आता प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे, असं भुजबळ म्हणाले.

होर्डिंगमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा काय गुन्हा होता? शासन पाच लाख रूपये देईल? विषय संपला का? या प्रकरणाची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची गरज आहे, असंही भुजबळ म्हणाले.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x