अवकाळी पावसातील होर्डिंग दुर्घटनेला राजकीय रंग
अवकाळी पावसाने मुंबईकरांवर काळाचा घाला घातला. घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपवर भलं मोठं होर्डिंग पडल्याने पेट्रेलपंपाखाली काही लोकं अडकली गेली. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले तर काहींना त्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तसेच १०० लोकं या पेट्रोल पंपाखाली अडकले होते. अडकलेल्या ७४ जणांना बाहेर काढण्यात आलं. जखमींवर राजावडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्याच अवकाळी पावसाने मुंबईमध्ये मोठं नुकसान झालं. एक मोठी दुर्घटना घडली. निष्पाप नागरिकांचे प्राण गमावले गेले. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
महिर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात घटनास्थळी शाब्दिक चकमक झाली होती. दोघेही उत्तर-पूर्व लोकसभा मुंबई मधून निवडणूक लढवत आहेत. किरीट सोमय्या कॅमेरा आत घेऊन शायनिंग मारत होते का? असा सवाल त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे नेते संजय दीना पाटील हे किरीट सोमय्यांवर आक्रमक होताना दिसले. भाजप नेते बचाव कार्यात अडथळा आणत आहेत. सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवण्यात आलं होतं. प्रशासनाच्या कामात अडथळे आणण्याचे काम सोमय्या करत आहेत, असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले होते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच लोकांनी देखील नेत्यांना सुनावलं. ‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच, असं काहींनी म्हटलंय.तसेच लोकांनी देखील नेत्यांना सुनावलं. ‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच, असं काहींनी म्हटलंय.





