कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य


नाशिक येथील भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालिचरण महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहेच, मात्र ज्यामध्ये धर्म नाही तो ढोर आहे. तसेच खाणे, झोपणे, सेक्स करणे, पिणे हे सर्व लक्षण पशूंमध्ये देखील असतात. त्यामुळे भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद आणि लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं आहे.

याशिवाय महामुनी अगस्त्य ऋषी हे माझे गुरू आहेत. माझ्या रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्ह मुहूर्तावरण प्रगट देखील झाले होते. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय मी वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

Advertisement

कालिचरण महाराज व्याख्यानादरम्यान म्हणाले कि, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? ईश्वराच्या बाबतीत देखील धर्माच्या अनेक व्याख्या रुजल्या आहेत. त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो अगदी त्या पेक्षा जास्त आनंद हा मिळालाच पाहिजे.

जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही”, असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x