उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबाची भेट..!!


देगलूर : श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या देगलूर येथील शहीद सचिन वनंजे यांना शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत अखेरचा निरोप देण्यात आला. देगलूर या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून नकळत अनेकांचे डोळे पाणावले.

Advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच सरकारला जे शक्य आहे ते तुमच्या कुटुंबासाठी करू असे आश्वासनही दिले. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले शहीदाच्या पत्नीला पुणे येथे नोकरीसाठी आणि भावाला पुढील नोकरीसाठी मदत करू आणि त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी पक्के घर बांधून देऊ असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर आणि अनेक आजी माजी मंत्री उपस्थित होते.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x