सत्यशोधक विवाह आणि सहजीवन आरंभ दोन जीवांचे …!!


काल दिनांक २६ मे रोजी मुंबईतील कांदिवली या ठिकाणी एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. आयु. विजयकुमार उत्तमबाई मनोहर कांबळे हे शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीशी निगडित आहेत. तसेच समाजात त्यांच्या सामाजिक कार्याला विशेष महत्व आहे. “आयु. विजयकुमार उत्तमबाई मनोहर कांबळे आणि आयु. पुनम अधिकराव धुमाळे” यांनी 150 वर्षा पूर्वी महात्मा फुले यांनी जी लग्नाची पद्धत सुरु केली होती ती म्हणजे “सत्यशोधक विवाह पद्धत”.

या सत्यशोधक विवाहाला सुरुवात करण्यापूर्वी याची पार्शभूमी ही “युवा भारत संघटनेचे मार्गदर्शक “मा. शशिकांत सोनवणे” यांनी मांडली. त्यानंतर या दोहोंच्या हस्ते “तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्रिशरण पंचशीला घेऊन वंदन करण्यात आले. यानंतर “मा. दिशा पिंकी शेख” ज्या तृतीयपंथी असून लेखिका, कवी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा तथा प्रवक्ता आहेत, तसेच “सत्यशोधक चळवळीत कार्यरत असणाऱ्या “मा. दिपाली तेंडोलकर” यांच्या सहकार्याने “सत्यशोधक विवाहाच्या प्रतिज्ञा” दारक आणि दारिकेला दिल्या आणि “महात्मा फुले” यांचा अखंड गावून दोघांवर पुष्प वृष्टी करून विवाह संपन्न झाला.

Advertisement

या सोहळ्यात एक आगळं वेगळं वैशिष्ट्ये होतं ते म्हणजे हॉल च्या प्रवेश द्वारातच “पुस्तकांचा स्टॉल” देखील लावण्यात आला जेथून स्वतः अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व इतर कलाकारांनी पुस्तके विकत घेतली. यामुळे या विवाह सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

“महात्मा फुले यांचे विचार” आणि “सत्यशोधक विवाह पद्धत” लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या विवाह सोहळ्यातून करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या विवाहाविषयी उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती.

या विवाह सोहळ्याला लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चला हवा येऊ द्या मधील लोकप्रिय अभिनेते अंकुर वाढवे, सिने कलाकार सुदेश जाधव, अमृता तोडरमल, पुष्कर सराड हे देखील उपस्थित होते तसेच स्थानिक “आमदार मा. सुनिल प्रभू” यांनी देखील त्यांचे शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते यांच्या सोबत लग्नाला हजेरी लावली आणि “विजयकुमार व पुनम यांना सहजीवनच्या शुभेच्या दिल्या.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे समतेचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात आले. नवोदित वधू वरांवर जमलेल्या जनसमुदायातर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सोहळ्याला दोन्हीकडचे नातलग सोडून वेगवेगळ्या संघटनेचे, पक्षाचे कार्यकर्ते मंडळी सुद्धा उपस्थित होते.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x