वाहनधारकांना HRPC प्लेट बंधनकारक


जुन्या वाहनांना अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) (HRPC) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नवीन वाहनांना खरेदी करतेवेळी ही प्लेट मिळत असली, तरी जुन्या वाहनधारकांना ती बाहेरून बसवून घ्यावी लागणार आहे.

देशभरात, १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट देणे वाहन उत्पादक कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले होते. नवीन वाहनांसोबत ह्या प्लेट मिळतात. वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, तसेच सोयीसाठी ह्या प्लेट बनवण्यात आल्या आहेत. या प्लेटवर होलोग्राम स्टिकर असते. तसेच, इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो.

Advertisement

या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटल्यानंतर पुन्हा जोडता येत नाही. बनावट प्लेट बनवणे शक्य नसते. तसेच, गाडी चोरीला गेल्यास किंवा गैरवापर झाल्यास, गाडी आणि गाडी मालकाची सर्व माहिती या प्लेटमुळे मिळते. काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेनंतर अधिकृत केंद्रात HRPC बसवून घेता येणार आहे. ३१ मार्चनंतर कायदेशीर कारवाईबाबत अद्याप तरी स्पष्टता नाही. परंतु जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जुन्या वाहनांना ही प्लेट बसवण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसाठी ४५०, तीनचाकी वाहनांसाठी ५०० आणि चारचाकी तसेच इतर वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x