“मैत्री चषक” सामना फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता मराठी शाळा वाचल्या पाहिजेत” हा संदेश देणारा सामना…!!


मुंबई : किसन राम गायकवाड

” मैत्री चषक” सामना फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता मराठी शाळा वाचल्या पाहिजेत” हा संदेश देणारा सामना…!!

अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आजी-माजी विद्यार्थी यांच्या ‘माझी शाळा माजी विद्यार्थी’ या ग्रुप तर्फे मैत्री चषक २०२५, पर्व २ रे ओव्हर आर्म क्रिकेट सामने कांदिवली पूर्व, लोखंडवाला संकुलातील विलासराव देशमुख मैदान (केज) येथे दिनांक १२/०१/२०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.

सदर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. शिरीष कासार सर यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने भवन्स कॉलेजचे प्रा. श्री. गवई सर, अनुदत्त विद्यालयाचे श्री. मनोज पाटील सर, श्री. कैलास महाजन सर, श्री. मिलिंद जाधव सर, श्री. दत्ता खराटे सर, श्री. आनंदा देशमुख सर, श्री. संजय भोसले सर, श्री. सुरेश घुले सर, श्री. बबन कातकडे सर आणि भारतमाता विद्यालयाचे श्री. गणेश कांबळे सर देखील उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. शिरीष कासार सर यांनी भूषविले.

मैत्री चषक २०२५ सामना एकूण ८ टीममध्ये खेळविन्यात आला. यामधे सन १९९८ ते २०२४ पर्यंतचे आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. हा सामना फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता मराठी शाळा वाचल्या पाहिजेत अशा आशयाच्या प्रबोधनात्मक मराठी पाट्या तयार करून सामाजिक जाणीव सुद्धा ‘माझी शाळा माजी विद्यार्थी’ या ग्रुपने समाजामध्ये रुजवली आहे.

तसेच पुढील काही महिन्यांत शाळेतील प्राचार्य मा. श्री. शिरीष कासार सर व शिक्षक मा. श्री. आनंदा देशमुख सर निवृत्त होत असल्याने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सामन्यांच्या मालिकेत रायगड रॉयल्स संघ अंतिम विजेते आणि शिवनेरी फायटर्स संघ उपविजेते ठरले.

Advertisement

सदर सामन्यांचे समालोचन माजी विद्यार्थी श्री. सचिन कांबळे आणि श्री. सतीश जाधव यांनी उत्कृष्टपणे केले. दिवसभर खेळल्या गेलेल्या सामन्यांसाठी आयोजनाची जबाबदारी ‘माझी शाळा माजी विद्यार्थी’ ग्रुपचे आयोजक श्री. प्रज्योत कदम, श्री. अभिजित पाळेकर, श्री. राहुल माघाडे, श्री. विजय सोमासे, श्री. रवींद्र पंदारे, श्री. प्रतीक वानखेडे, श्री. दिलीप मर्चंडे, श्री. महेंद्र करंबे, श्री. सतीश जाधव, श्री. प्रशांत कांबळे, श्री. रामदास वाघमारे, श्री. सुनील शिंदे, श्री. प्रकाश गायकवाड, श्री. भारत गवळी, श्री. विजय मर्चंडे, श्री. दीपक वाल्हे, श्री. दीपक पाडावे, श्री. राजन मांजरेकर, श्री. संजय मांजरेकर, श्री. विकास झाकडे, श्री. सिद्धार्थ गायकवाड, श्री. संतोष स्वामी, श्री. प्रकाश शिंदे, श्री. विकास कांबळे, श्री. नितिन शिंदे, श्री. विष्णू सुर्यवंशी, श्री. अशोक नर, श्री. निलेश केरकर, श्री. सागर खरात, श्री. सौदागर पवार, श्री. समीर गाडे, श्री. गणेश दळवी, श्री. सचिन मर्चंडे,श्री. शरद गायकवाड, श्री. मनोज झाकडे, श्री चंद्रशेखर महादे, सौ. बबिता सुरवसे, सौ. मानसी गुरव, सौ. मुदिता प्रबताणी, सौ. ज्योती गुजर, सौ. शैला वांगणे, सौ. विद्या मर्चंडे, सौ. दर्शना चाळके, सौ. सुचिता पियालकर, सौ. स्मिता सुर्वे जाधव, कुमारी शुभांगी मोहिते, सौ. धनश्री सावंत, सौ. सारिका शेजव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे खेळाडू, शिक्षकवर्ग तसेच विभागातील रहिवासी, शाळेतील आजी-माजी विद्यार्थी, पाहुणे आणि हितचिंतक यांचे ‘माझी शाळा माजी विद्यार्थी ग्रुप’ तर्फे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x