पत्रकारिता ही पॉवर नाही, रिस्पॉन्सीबीलिटी आहे” याची जान असणारा पत्रकार संजय बोर्डे यांचे दुःखद निधन..!!
मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे
“पत्रकारिता पावर नही, रिस्पोंसबिलीटी हैं…!!
“एवढं महत्वाचं वाक्य स्वतःच्या फोटो वर लिहिणारा एकमेव माणूस म्हणजे “पत्रकार संजय बोर्डे” यांची रात्री 10:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.
संजय बोर्डे यांचा स्वभाव नेहमीच दिलखुलास, दिमाखदार, ऐटीत राहण्याचा होता. एखाद्या गाण्यावर मस्त नाचताना रील बनवायचा. लोक काय विचार करतील, काय बोलतील याचा कधीच विचार न करता मस्तमौला जिंदगी जगत राहणारे.
पत्रकार तरुणांची संघटना असावी म्हणून दामूनगर मधील अनेक तरुण पत्रकार तयार करून कांदिवलीत अनेकांना घडवल आणि त्यांना एकत्र करून पत्रकारांची संघटना देखील उभी केली.
काल परवाच दामू नगर, भीम नगर ते समता नगर पोलीस ठाणे येथे अमित शाह विरोधी निषेध मोर्चा काढला असता तिथे ते पोटतिडकीने अनेकांच्या मुलाखती घेत होते तेव्हा भेटले आणि माझीही मुलाखत घेतली आणि आठवणीने माझा उल्लेख “कांदिवलीत संविधान संवर्धन समिती” च्या वतीने “संविधान रॅली” काढणारे विजय कांबळे असा केला होता.
खरं तर हे संजय बोर्डेच वय नव्हतं असं सोडून जाण्याच पण हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे प्राण गेले.
त्याच्या पत्रकारितेची रिस्पॉन्सीबीलिटी पार पाडत असताना जरा स्वतःच्या तब्बेतीची काळजी सुद्धा घ्यायची असते आणि ही सुद्धा त्याचीच रिस्पॉन्सीबीलिटी होती हे मात्र संजय बोर्डे विसरला हे खरंच अविश्वसनीय आहे.
संजय बोर्डे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि मुलगा आहे.अशा या अचानक जाण्याने कुटुंबावर जे दुःख कोसळले आहे त्या दुःखात मीही सहभागी होत दुःखातून सावरायला बळ मिळो याचं जड अंतकरणाने अपेक्षा.
संजय बोर्डे यांना “संविधान संवर्धन समिती – कांदिवली तर्फे अखेरचा क्रांतिकारी जयभिम 🌹🙏🏻🌹
टीप :- अंत्ययात्रा आज दुपारी 12:30 वाजता नालंदा बुद्ध विहार, दामू नगर येथून निघणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.





