सावित्रीबाई फुले म्युनिसिपल रुग्णालय, बोरिवली (पूर्व), चा भोंगळ कारभार..!!
मुंबई : सावित्रीबाई फुले म्युनिसिपल रुग्णालय, बोरिवली (पूर्व) या रुग्णालयात रुग्ण भेटीची वेळ, रक्त तपासणीची वेळ, केस पेपर काढण्याची वेळ ही सकाळी ०८:३० ते ११:३० आहे. पण जुने पेपर असेल आणि दुसऱ्या दिवशी रक्त तपासणीसाठी गेल्यास नवीन पेपर लिहून देतात आणि परत पैसे भरायचा काउंटर ०९:०० वाजता चालू होतो. परंतु प्रश्न असा आहे की जर नवीन केस पेपर काढताना जिथे पैसे घेतले जातात त्या ठिकाणी हे पैसे न घेता परत नवीन काउंटर वर पुन्हा रांगेत उभा राहायला लावतात, यात जवळपास दीड तासांचा वेळ वाया जातो.
मग पालिका प्रशासन यांना सर्व काउंटर एकाच वेळी खुले करण्याचा आदेश का देत नाहीत. याचा अर्थ सरकारी दवाखान्यात रुग्ण येऊ नयेत. त्यांनी वैतागून खाजगी दवाखाना गाठला पाहिजे. म्हणजेच खाजगी रुग्णालय चालले पाहिजेत. ती खाजगी रुग्णालये भरगच्च पैसे घेऊन मोठ्या इमारती बांधल्या पाहिजेत. यासाठीच राज्य आरोग्य विभाग काम करत आहे का? म्हणजे तुम्हाला जर आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी करावयाची असेल तर तुम्हाला जवळ जवळ चार ते पाच चकरा मारूनच तपास करून घ्यावा लागेल.
प्रशासन खरंच कल्याणकारी काम करत आहे का? गेली कित्येक वर्ष झाली ही परिस्थिति आपण पाहत आहोत. पुढे तरी ही परिस्तिथी सुधारेल याची कोणी हमी देईल का? की लोकांना नुसत्या चकरा मारूनच आपल्या जीवाशी खेळत बसावे लागेल. आरोग्य विभागाने सांगावे की खरंच सरकारी इस्पितळात रुग्णांनी आशा घेऊन जावं की न जाता तडफडत रहावं?





