मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून ST ,SC आणि OBC यांना देऊ

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत वक्त्यव्य केले होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
तेलंगणातील भोंगीर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा यांनी भाजप सत्तेत आल्यास SC, ST आणि ओबीसींच्या आरक्षणात वाढ करू आणि मुस्लिम आरक्षण रद्द करू असे वक्त्यव्य केले आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर देशात खळबळ उडाली आहे.
अमित शहा म्हणाले, काँग्रेसला खोटे बोलून निवडणूक लढवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तर आरक्षण संपवू असे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी गेली 10 वर्षे देशाचे नेतृत्व करत आहेत, पण त्यांनी आरक्षण संपवले नाही, उलट मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देऊन काँग्रेस पक्षाने SC, ST आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घातला आहे.
ते पुढे म्हणाले, २०१९ मध्ये तेलंगणाच्या जनतेने आम्हाला चार जागा दिल्या. पण यावेळी आम्ही तेलंगणात लोकसभेच्या 10 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण संपवू आणि SC, ST आणि OBC यांचं आरक्षण वाढवू असे ते म्हणाले.
तसेच २०२४ च्या निवडणुका राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्यात आहेत. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.




