बारामती लोकसभा मतदारसंघात गोळीबार


 

 

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघामधे काल मतदानानंतर धक्कादायक प्रकार घडला. वारजे माळवाडी या भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील वारजे माळवाडी भागात रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी हवेत केलेल्या गोळीबारामुळे या भागात एकाच खळबळ उडाली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये किरकोळ कारणामुळे कोयते हल्ले झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोळीबार केला जात आहे. वारजे हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काल रात्री मतदान झाल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी गोळीबार केला.

Advertisement

घडलेल्या घटनेमुळे वारजे परिसरात शांतता पसरली आहे. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर मुंबई-पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेने पळ काढला. आरोपींनी गोळीबार करण्या मागील कोणतेही ठोस कारण अद्यापही समोर आलं नाही. मात्र गोळीबारामुळे वारजे माळवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांमध्ये पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. जंगली महाराज रोडवर एका व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हडपसर येथे गोळीबाराची घटना घडली होती. तर काही दिवसांआधी एका मुलीने प्रेमासाठी नकार दिल्याने युवकाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x