नाद करायचा न्हाय – धनंजय मुंडे
४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलाच झटका बसला आहे. यावेळी तर भाजपला स्वबळावर ३०० जागा देखील पार करता आल्या नाहीत. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. भाजपला सर्वात मोठा धक्का बसलो तो म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात. महाराष्ट्रात भाजपच्या दिग्गज नेत्यांना देखील पराभव स्विकारावा लागला.
अजित पवार यांनी काकांचा पक्ष तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. भाजप, शिंदे आणि अजितदादा यांनी यावेळी महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवली. पण भाजपचा हा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा ठरला.
महाराष्ट्रात महायुतीला जागा मिळाल्या पण जनतेचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही. याचा फायदा देशात इंडिया आघाडीला झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झाला.
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली. पण या लोकसभेत शरद पवारच किंगमेकर ठरल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. शरद पवारांवर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वांनी टीका केली. मात्र सोशल मीडियावर पवारांनी भाजपला धडा शिकवल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. सध्या अजित पवार गटात असलेल्या धनंजय मुंडेंचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका, असं म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.
पवार साहेबांचा नाद केला आणि साहेबांनी आम्हां दोघा बहिण भावाला कायमचं घरी बसवलं. म्हणून सांगतो पवार साहेबांचा कोणी नाद करू नका. भोगा कमळाची फळं आता, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.





