स्वराज्य मित्र मंडळ, क्रांती नगर येथे ‘शिव संवाद’ कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!!


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

स्वराज्य मित्र मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘शिव संवाद – इतिहासाच्या अभ्यासकांसोबत’ हा विशेष कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि वैचारिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अनुदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रो. श्री. कैलास महाजन सर आणि प्रो. श्री. लक्ष्मण फड सर यांनी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. महाराजांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वगुणांची समकालीन संदर्भात अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Advertisement

या अभिनव उपक्रमाची संकल्पना ‘माझी शाळा माजी विद्यार्थी संघ’ प्रतिनिधी श्री. प्रज्योत कदम यांनी मांडली होती. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

स्वराज्य मित्र मंडळाच्या या प्रयत्नांमुळे यंदाचा शिवजयंती उत्सव अधिक अर्थपूर्ण आणि वैचारिक झाला असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली. मंडळाच्या वतीने सर्व मार्गदर्शक, पाहुणे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x