“आंबेडकर विरुद्ध आठवले? राज्यसभेसाठी महाराष्ट्रात राजकीय खलबतं; मविआचा प्रकाश आंबेडकरांना ‘मास्टरस्ट्रोक’चा प्रस्ताव”


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती यांच्यातील जागांचे समीकरण आता स्पष्ट होऊ लागले आहे. विरोधी पक्षाच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी महाविकास आघाडीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

विरोधी पक्षांकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांना केवळ एक जागा मिळवणे शक्य आहे. या जागेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार अमित देशमुख हे प्रकाश आंबेडकर यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे समजते. आंबेडकरी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या कोट्यातून आठवले यांची वर्णी लागली असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महायुतीकडे असलेल्या प्रचंड बहुमतानुसार ७ पैकी ६ जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Advertisement

या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च असून, १६ मार्चला मतदान होणार आहे. प्रकाश आंबेडकर या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x