‘चला मुंबईत, एल्गार पुकारूया!’; २ मार्चच्या मोर्चासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये युवकांना जाहीर आवाहन..!!


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हक्कांसाठी येत्या २ मार्च रोजी मुंबईत एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या या महामोर्चामध्ये मुंबईतील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद:मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि युवकांचे संघटन करण्यासाठी मुंबईतील विविध नामांकित महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी युवा पिढीचे प्रश्न आणि मोर्चाची गरज यावर चर्चा करण्यात आली. या मोहिमेत युवा अध्यक्ष सागर रमेश गवई, मुंबई महिला अध्यक्षा स्नेहल सोहनी, मुंबई सदस्य प्रियंका कदम, साक्षी वाघमारे, आर्यन भोसले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

युवकांचा सहभाग निर्णायक ठरणार:”हा मोर्चा केवळ एका संघटनेचा नसून सामान्यांच्या अस्मितेचा लढा आहे. युवकांनी आपल्या भविष्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध एकत्र येणे काळाची गरज आहे,” असे स्पष्ट मत युवा अध्यक्ष सागर रमेश गवई यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबईतील प्रत्येक कॉलेजमधून जास्तीत जास्त युवक या मोर्चात सामील होतील आणि आपला आवाज बुलंद करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या संवाद दौऱ्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, २ मार्च रोजी मुंबईच्या रस्त्यावर युवकांचा महासागर लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x