नाशिक हादरले! IT कंपनीनंतर आता पंचवटीत ‘धर्मांतर’ प्रकरण; आरोपी जेरबंद..!!


मुंबई/नाशिक: निर्भीड समाचार वृत्तसेवा

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण ताजे असतानाच, पंचवटी परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीने तिला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदार याने पीडित तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि सिगारेट ओढायला लावली. त्यानंतर तिचे शारीरिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडितेच्या गळ्यातील धार्मिक तुळशीची माळ आणि हातातील धागे तोडून फेकून दिले. इतकेच नाही तर तिला एका विशिष्ट धर्माचे रीती-रिवाज पाळण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

ब्लॅकमेलिंग आणि ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख
पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने तिला एका लॉजवर नेऊन तिचे काही आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. तसेच, ‘गजवा-ए-हिंद’च्या नावाखाली तिला धार्मिक रित्या मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोपही तिने केला आहे.

पोलिस कारवाई आणि तपास
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंचवटी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तंजीर इनामदार याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी आयटी कंपनीत घडलेल्या ‘आयटी जिहाद’ प्रकरणानंतर अशाच स्वरूपाची ही दुसरी घटना समोर आल्याने शहरात संतापाची लाट आहे. अशा प्रकारे इतरही काही मुलींचा छळ झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

Advertisement

हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त
नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक अशा घटना समोर येत असल्याने हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आयटी कंपन्यांमध्ये आणि सुशिक्षित वर्गातही अशा प्रकारचे प्रकार घडत असतील, तर महिला सुरक्षित कुठे आहेत?” असा सवाल विचारला जात आहे. पंचवटीतील या घटनेनंतर शहरातील विविध भागांत तणावाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुलींनी सावध राहण्याचे आवाहन
नाशिक पोलिसांनी या निमित्ताने तरुणींना आणि महिलांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडूनही अशा प्रकारे त्रास, ब्लॅकमेलिंग किंवा धर्मांतरासाठी दबाव येत असेल, तर घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तुमची ओळख गुप्त ठेवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंचवटी पोलीस या प्रकरणातील तांत्रिक पुराव्यांची (CCTV आणि मोबाईल चॅट्स) कसून चौकशी करत असून, तंजीर इनामदार याने यापूर्वी अशा प्रकारे इतर कोणाला जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास सुरू आहे.

या घटनांमुळे कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस आता या दोन्ही प्रकरणांचे एकमेकांशी काही धागेदोरे आहेत का, याचा शोध घेत आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x