“विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळणार विज्ञानाचे बळ; लोखंडवाला परिसरात ऐतिहासिक ‘सायन्स पार्क’चे पाऊल”


कांदिवली/मुंबई : निर्भीड समाचार News Desk

कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २७ मधील अण्णाभाऊ साठे उद्यान येथे एक अत्याधुनिक आणि भव्य विज्ञान पार्क (Science Park) साकारले जात असून, हे लोखंडवाला परिसरासाठी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
हे विज्ञान पार्क केवळ मनोरंजनाचे साधन नसून, विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि प्रायोगिक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. विविध शाळांतील हजारो विद्यार्थी येथे भेट देऊन विज्ञानातील विविध संकल्पनांचे प्रत्यक्ष आणि रंजक पद्धतीने शिक्षण घेऊ शकतील.

Advertisement

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार अतुल भातखळकर साहेब आणि माजी नगरसेविका सौ. सुरेखा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळेच अण्णाभाऊ साठे उद्यानाचे रूपांतर एका आधुनिक सायन्स पार्कमध्ये होत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या पुढाकारामुळे कांदिवलीतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x