लातूर पोलिसांच्या चोख नियोजनावर ना. रामदास आठवले फिदा; विश्रामगृहात कर्मचाऱ्यांशी साधला थेट संवाद!
लातूर/मुंबई : निर्भीड समाचार News Desk
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल रात्री लातूर दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले असता, पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मंत्री महोदयांनी त्यांचा हा दौरा यशस्वी आणि सुरळीत पार पडावा यासाठी लातूर पोलिसांनी केलेल्या चोख बंदोबस्ताचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे विशेष कौतुक केले.
तसेच प्रशासकीय तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करताना आठवले यांनी समाजमाध्यमाद्वारे लातूर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा देखील घेतला.
या प्रसंगी त्यांनी अनुसूचित जाती, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठीच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.




