पॉर्श प्रकरण “सगळं सॉल्व्ह होईल”


 

पुण्यातील कल्याणीनगर मधील कार अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. अशात अग्रवालांच्या निकटवर्तीयांनी पत्रकारांशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेत असताना अग्रवाल कुटुंबातल्या एकाने पत्रकारांशी अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि चालकाची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली यावेळी सुरेंद्रकुमार याच्याबरोबर असलेल्या एकाने स्वत:ला वकील असल्याचे सांगत पत्रकारांशी अरेरावी केली.

सुरेंद्र अग्रवाल असलेल्या या व्यक्तीने पत्रकार बाजूला असल्याचे लक्षात येताच ‘हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉल्व्ह होईल, त्यांच्या नादी का लागत आहेत?, असं म्हटलं होतं.

Advertisement

सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस नेत असताना पत्रकार वारंवार छोटा राजनशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर काहीही न बोलता अग्रवाल वारंवार आपला नातू अल्पवयीन असल्याचं बोलत होते. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने अरेरावी केल्याचं समोर आलंय.

दरम्यान, अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x