चक्रीवादळ धडकणार


राज्यात सध्या अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कहर केला आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेमुळे मोठं नुकसान झालं. ही घटना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घडली आहे. अशातच आता चक्रीवादळाबाबत हवामान विभागानं महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे राज्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Advertisement

हवामान अभ्यासकांनी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने चक्रिवादळाची संभावना सांगितली आहे. या चक्रीवादळाने देशभरात मुसळधार पावसाची मोठी शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन ते तीन दिवसांपासून कोकणात अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x